(अनेकदा आई स्वत:च्या भावना शब्दांतून व्यक्त करते पण वडिलांना ते फारसे जमत नाही त्यामुळे बहुतेकदा आईच सर्वश्रेष्ठ ठरली जाते पण बाबाही तितकेच महत्वाचे असतात ..
सायकल ,पोहणे या सारख्या गोष्टी आईपेक्षा बाबा जास्त शिकवतात ,,,पण कितीस लक्षात घेतलं जात हे ..???
त्यांच रागवण दिसत पण प्रेम करण नाही ...विशेषता तारुण्यात प्रवेश करणारया मुलांच्या (मुलगे)नि त्यांच्या वडिलांच्या नात्यात दरी पडताना दिसून येते बऱ्याचदा...याच उद्देशाने मुलाना उद्देशून लिहिली आहे ही कविता )
पहिला स्पर्श तुझा,
त्याला पुलकित करतो
मग केवळ तुझ्याच ,
भविष्यासाठी जो जगतो
तो बाप असतो ...!!!
शब्दांत व्यक्त होण
जमत नाही ज्याला
तू आजारी असताना
वेदना होते पण काळजाला
कारण तुझीच चिंता असते रे बापाला ...!!!
नापास झाल्यावर दिलाही
असेल जरी पाठीत धपाटा
सांग पण त्याने कधी
झाला का रे तुझा तोटा ..???
म्हणूनच बापाला समजू नकोस 'छोटा' ...!!!
पहिला आलास शर्यतीत तेव्हा
'माझा छावा 'म्हटला असेल खुशीने
त्यानेच नाही तुला, सायकल
शिकवली मोठ्या हौशीने
तू होताना 'पुरुष' धीर दिलाच असेल 'ना'त्याने ...!!!
चोरून ठेवले असेल
पापाणितल्या 'पाण्याला'
नि पाठीवर हात,
तुझ्या पहिल्या पगाराला
सार्थ जन्माचे तेव्हा वाटले असेल त्याला ...!!!
वर काटे असले तरी गरयासारखे
गोड हृदय असते रे बापाला
गरज असते 'आधाराची '
कधी कधी त्याही 'आधाराला'
म्हणूनच न झिडकारता
शोध बापातल्या 'बाबाला' ...!
by kapil
Filmi Tarka Group
You May also Like.....
0 comments:
Post a Comment